Crop Insurace 2023: राज्यातील 231 मंडळांमध्ये पावसातील खंड 21 दिवसांपेक्षा जास्त;मिळणार सोयाबीन पीक विमा हेक्टरी 25 हजार,पहा मंडळाची यादी

Crop Insurace 2023:Advance Compensation : पावसात खंड पडल्यावरही विमा भरपाई मिळते का? मिळत असेल तर किती मिळू शकते? पीक विमा भरपाई काढण्याची नेमकी भानगड काय आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात आले असतीलच. नेमकं याच कळीचा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत.

मिळणार सोयाबीन पीक विमा हेक्टरी 25 हजार

पहा मंडळाची यादी

राज्याच्या अनेक भागात एक महिन्यापासून पाऊस नाही. कृषी आयुक्तालयानं सांगितलं की राज्यातील २३१ मंडळांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त आहे. मग, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आपण पीक विमा तर भरला. पण पावसात खंड पडल्यावरही विमा भरपाई मिळते का? मिळत असेल तर किती मिळू शकते? पीक विमा भरपाई काढण्याची नेमकी भानगड काय आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात आले असतीलच. नेमकं याच कळीचा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत.

पहिला प्रश्न म्हणजे, पाऊस कमी पडणं, म्हणजे किती कमी पडल्यावर हि प्रक्रिया सुरु होते ? तर पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिकचा खंड दिल्यास म्हणजेच पाऊसच आला नाही तर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळते. या २१ दिवसांच्या काळात एका दिवसात २.४ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला नसावा. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत पीक विमा भरपाईची तरतूद आहे.

तुमच्या मंडळात जर पावसामध्ये सलग २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडला आणि पीक विमा समितीच्या सर्वेक्षणात उत्पादनात घट होणार असं लक्षात आलं, तर २५ टक्के अग्रीम भरपाईची मिळू शकते.  पण यात जिल्हाधिकाऱ्यांची भुमिका खूप महत्वाची असते. जिल्हाधिकारी आपल्या मंडळात प्रथमदर्शनी उत्पादनात घट दिसत असल्यास तालूका पीक विमा समितीला नुकसान सर्वेक्षणाच्या सूचना देतील.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तालुका पीक विमा समिती सर्वेक्षण करेल. त्यासाठी ८ दिवसांचा कालावधी असतो. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, विषय जाणकार आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो. शेतकरी म्हणून तुम्ही या समितीत सहभाग घेणं खूप महत्वाचं आहे. तालुका पीक विमा समितीने सर्वेक्षण करून उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी राहील, असा अहवाल दिला तर जिल्हाधिकारी तुमच्या मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम भरपाई देण्याची अधिसूचना काढू शकतात. पण विमा कंपन्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेवरून भरपाई देतीलच असं नाही. कंपन्या अग्रीम भरपाई नाकारूही शकतात. असं झाल्यास हा विषय  सुनावणीसाठी वेगळ्या समितीकडे जातो.

Leave a Comment