कर परतावा मिळण्याची वाट पाहताय?
कधी मिळणार ते ‘असे’ तपासा
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै आहे. आतापर्यंत एकूण 3.06 कोटी आयटीआर भरण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. यापैकी 2.81 कोटी परताव्याची ई-पडताळणी करण्यात आली आहे. तर आयकर विभागाने कर परतावा देण्यासही सुरूवात केली आहे. जवळपास 1 कोटींहून अधिक करदात्यांना परतावा मिळाला आहे.
तुम्ही अधिक कर भरला असेल तर तुम्ही आयटीआर भरून परतावा मिळण्यासाठी दावा करू शकता. त्यानंतर आयकर विभागाला तुमचा दावा योग्य वाटत असेल तर त्याची माहिती तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे पाठवली जाईल. या मेसेजमध्ये आयकर विभाग तुमच्या खात्यात किती रक्कम परत केली जाईल हे सांगेल. यासोबतच रिफंडचा क्रमांकही पाठवण्यात येतो. स्टेट बँक ऑफ इंडिया कर परताव्याची प्रक्रिया करते. परतावा थेट करदात्याच्या खात्यात जमा केला जातो किंवा त्याच्या पत्त्यावर चेक किंवा डिमांड ड्राफ्ट पाठवला जातो. त्यामुळे आयटीआर भरताना बँकेचे तपशील अचूक दिलेले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.Income Tax Refund
परतावा परत मिळण्याची विनंती पाठवा
कोणत्याही प्रकारच्या चुकीमुळे परतावा मिळाला नसेल तर तुम्हाला एकदा विनंती अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
1. प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
2. ‘my account’ वर क्लिक करा. त्यानंतर service request पर्याय निवडा.
3. New Request वर क्लिक करा. त्यानंतर Refund reissue निवडा.
4. पॅन, रिटर्नचा प्रकार, मूल्यांकन वर्ष, पावती क्रमांक आदी तपशील नवीन स्क्रीनवर दिसतील.
5. ‘सबमिट’ वर क्लिक करा.
6. तुम्हाला तुमची बँक खाते आणि पत्त्याचा तपशील सबमिट करावा लागेल.
7. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सत्यापन कोड (EVC) किंवा डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) द्वारे पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल.