परताव्याची स्थिती जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत.

परताव्याची स्थिती जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत.
1. आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर
2. TIN NSDL वेबसाइटवर

ई-फायलिंग वेबसाइट
1. सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.
2. पॅन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
3. ‘Review Returns/Forms’ वर क्लिक करा.
4. ड्रॉप डाउन मेनूमधून ‘Income Tax Returns’ निवडा. ज्या मूल्यांकन वर्षासाठी तुम्हाला आयकर परताव्याची स्थिती तपासायची आहे ते निवडा.
5. तुमच्या पोचपावती क्रमांकावर (acknowledgment number) क्लिक करा
6. रिटर्न भरण्याची टाइमलाइन दर्शविणारी एक पॉप-अप तुमच्या स्क्रीनवर दिसेल. उदा. तुमचा ITR कधी भरला आणि सत्यापित केला गेला, प्रक्रिया पूर्ण झाल्याची तारीख, परतावा जारी करण्याची तारीख इ.
7. याशिवाय मूल्यांकन वर्ष, स्थिती, रिफंड न मिळण्याचे कारण आणि पेमेंटची पद्धत देखील दर्शवेल.

NSDL वेबसाइट
TIN NSDL वेबसाइटवरही आयकर परतावा स्थिती तपासू शकतो. परतावा पाठवल्यानंतर 10 दिवसांनी वेबसाइटवर परताव्याची स्थिती दाखवली जाते. आयकर परताव्याची स्थिती अशी तपासा.
1. सर्वप्रथम https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html वर जा.
2. तुमचा पॅन तपशील भरा करा
3. परताव्याची स्थिती तपासायची आहे ते वर्ष निवडा.
4. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा. तुमच्या परताव्याच्या स्थितीवर आधारित तुमच्या स्क्रीनवर एक संदेश दिसेल.