Eclectic Tractor : अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खुशखबर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत?
E – Tractor News- काळाच्या ओघात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे यामध्येच सेंट्रल मॅकेनिकल इंजिनिरिंग रिसर्च इंस्टिट्यूट म्हणजेच सीएसआयआर प्रीमा ईटी ११ हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. ईटी ११ हा ट्रॅक्टर ७ ते ८ तास चार्ज केला तर चार तास शेतीची कामं करू शकतो. farming techniques
कृषी अवजारांचं प्रशिक्षण
ट्रॅक्टर खरेदीसाठी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज
विद्यार्थ्यांना कृषी अवजारांचं प्रशिक्षण
देशातील कृषी अवजारांसाठी नामांकित साऊदर्न रिजन फार्मर्स मशिनिरी टेस्टिंग आणि ट्रेनिंग इंस्टिट्यूट म्हणजेच एफएमटीटीआयनं शेतकऱ्यांसाठी शेती अवजारांचं प्रशिक्षण आयोजित केलं.
एफएमटीटीआयही दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करत असते.
शेतकऱ्यांसोबतच अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती अवजारांचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये स्वयंचलित अवजारांचा वापर आणि शेती अवजारांवरील संशोधन याचंही प्रशिक्षण दिलं जातं. अलीकडेच संस्थेनं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे.
ई-ट्रॅक्टर चे फीचर्स आणि किंमत येथे पहा
ट्रॅक्टर खरेदीसाठी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज
मागील तीन महिन्यात देशातील ट्रॅक्टर खरेदी आणि निर्यात वाढली आहे. देशातील कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळं कृषी ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिली जात आहे.
सध्या सणांचा काळ आहे. त्यामुळे शेतकरी शेती अवजारे खरेदीला प्राधान्य देतात. परंतु देशातील बहुतांश भागात मॉन्सूनच्या पावसानं ओढ दिली आहे.
त्यामुळं शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ट्रॅक्टर खरेदी करता यावं, यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ७ वर्ष मुदतीचं आणि ट्रॅक्टरच्या किमतीच्या ९० कर्ज बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत चौकशी करू शकता.
कृषी यांत्रिकीकरणात भारत
जमिनीची मालकी सिद्ध करणारे ही 7 कागदपत्रे तुमच्याकडे आहे का? पहा
आता रोबो करणार रोपांची लागवड
रोबोटिक्सच्या मदतीनं शेती क्षेत्रात बदल घडत आहेत. याचाच एक भाग म्हणजे रोपे लागवड करणारा रोबो! रोपे लागवड करणारा रोबो सर्वसाधारणपणे पेरणी करणाऱ्या यंत्र मानवाप्रमाणेच असतो.
पण रोपे लागवड करणाऱ्या यंत्रमानवामध्ये बीजन यंत्रणेऐवजी रोपे लागवड यंत्रणा असते. मात्र यात रोपे सुरक्षितपणे ठेवून, ती धरून योग्य प्रकारे हाताळण्याची व्यवस्था केलेली असते.
रोपे लागवड यंत्रमानवही जी.पी.एस. सक्षम नकाशा किंवा त्याने स्वतःवरील सेन्सरच्या मदतीनं गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेतो. जमिनीचा प्रकार व ओलाव्याप्रमाणे योग्य जागेवर व योग्य खोलीवर रोपांची लागवड करतो.
देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक आहे. या शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठ्या ट्रॅक्टरचा उपयोग करताना अडचणी येतात.
तसेच डिझेलवरील ट्रॅक्टरचा वापर पर्यावरण दूषित करतो. हीच अडचण ओळखून सेंट्रल मॅकेनिकल इंजिनिरिंग रिसर्च इंस्टिट्यूट म्हणजेच सीएसआयआर प्रीमा ईटी ११ हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. ईटी ११ हा ट्रॅक्टर ७ ते ८ तास चार्ज केला तर चार तास शेतीची कामं करू शकतो.
तसेच फवारणीसारखी कामं सहा तास करतो. या ट्रॅक्टरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांही हा ट्रॅक्टर सहज चालवू शकतात. तसेच १.८ टन वजनाची ट्रॉली हा ट्रॅक्टर ओढू शकतो, असा दावा सीएसआयआरनं केला आहे.
लवकरच कुशल या ब्रॅंडनेमनं हा ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सीएसआयआर सांगितलं आहे.
ई-ट्रॅक्टर चे फीचर्स आणि किंमत येथे क्लिक करा