PM Kisan 15th Installment : पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. सप्टेंबर महिन्यातच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण त्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण केले नाही, त्यांना ही रक्कम मिळणार नाही.
‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा 15 वा हप्ता
या तारखेला होईल जमा
योजनेला झाली पाच वर्षे
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादीत होती. पण आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. या योजनेतंर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात 2000-2000-2000 रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. एका वर्षात एकूण 6,000 रुपये जमा होतात. या योजनेतंर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान देण्यात येतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या काळात देण्यात येतो. तर तिसरा हप्ता केंद्र सरकार 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान हस्तांतरीत करण्यात येतो.
यादीत आहे की नाही नाव
15 वा हप्ता जमा होणार आहे. या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तापसण्यासाठी अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करावे लागेल. या ठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भराय सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा. योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.
असे करा ई-केवायसी
- पीएम किसान मोबाईल एपवर, फेस ऑथेंटिकेशन फीचर येते.
- याठिकाणी शेतकरी घरबसल्या ई-केवायसी करता येते.
- त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओटीपी गरज नसेल.