battery charg spray pump बॅटरी चार्ज मोफत फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ असा करा ऑनलाईन अर्ज
मुंबई : राज्य सरकारने सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्ज करणेबाबतची कार्यवाही
अर्ज करणे साठी वेबसाईट
“https://mahadbt.maharashtra.gov.in”
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे
“अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे
“कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे
“मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे
“तपशील” बाबीवर क्लिक करून –
“मनुष्यचलित औजारे घटक निवड”
“यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”
“बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे
जतन करणे
नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात यादी पहा