अशा प्रकारे घ्या योजनेचा लाभ
*योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
* अर्ज करताना तुम्ही कुणाकडे म्हणजे सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यापैकी कुणाकडे अर्ज करीत आहात त्या नावापुढे बरोबर अशी खून करायची आहे.
*त्यानंतर ग्रापंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा आणि अर्जाच्या उजवीकडे तारीख टाकून तुमचा फोटे चिटकावयाचा आहे.
*त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव, पत्ता, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
*आता तुम्ही ज्यासाठी अर्ज करीत आहात त्यावर बरोबर अशी खुन करा.
आता अर्ज भरताना घ्यावयाची काळजी
*अर्जामध्ये तुमच्या कुटुंबाचा प्रकार म्हणजे अनुसुचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, महिलाप्रधान कुटुंब, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्प भुधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारा आपले कुटुंब आहे त्याचा उल्लेख करावा लागणार आहे.
*तुम्ही जो प्रकार निवडला त्याच्या कागपत्राचा पुरवाही जोडावा लागणार आहे.
*शिवाय लाभार्थ्य़ाच्या नावे शेतजमिन आहे का, असल्यास त्याचा सातबारा, आठ ‘अ’ आणि ग्रामपंचायत नमुना जोडायचा आहे.*यानंतर रहिवाशी दाखला जोडायचा आहे. शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला ते काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्येच येते का, ते ही भरावे लागणार आहे.
*ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्या कुटुंबातील सदस्यसंख्या ती पण 18 वर्षा पुढील सदस्यांची संख्या नमूद करायची आहे.*शेवटी घोषणा पत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
*अर्जा सोबत मनरेगा जॅाब कार्ड, 8- अ, सात बारा उतारा, मालमत्ता नमुना 8 अ उतारा जोडायचा आहे.
*त्यानंतर ग्रामसभेत ठराव घ्यावयाचा आहे.*यानंतर तुमच्या कागपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. व पंतायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही शिक्यानुसार पोचपावती दिली जाईल यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात का नाही हे सांगितले जाणार आहे.
*तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असताल तरीही लाभ घेता येईल पण जर जॅाब कार्ड नसेल तर मात्र लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जॅाब कार्डसाठी तुम्ही ग्रामपंयायतीमध्ये अर्ज करु शकता