वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रू.पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु. दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष/टपालाद्वारे आवश्यक कागदपत्रासह दाखल करावेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना व सविस्तर माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.