या “दोन” कागदपत्रांशिवाय बँक खात्यात पैसे जमा होणार नाही?

मोठ्या रकमेचे व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे तुमच्यासाठी बंधनकारक असेल. केंद्र सरकारने रोख पेमेंट करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. सरकारने पैसे काढण्याची मर्यादा बदलली आहे. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठी रोख रक्कम ठेवण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजे आता बँकेत मोठी रक्कम जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागेल.