CIBIL SCORE कसा सुधारेल ?

1) EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नक

.2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट )

3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan Digital loan  कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा

4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या .

5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही

.6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा .

CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते . 

या मध्ये 

NA – No Activity

NH – No History

असे पर्याय दिसू शकतात .

तर काय करा कि , एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा  , अशा प्रकारे  CIBIL मध्ये आपली History तयार होईल .म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज ,बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा !नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही .