कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. महागाई वाढली आहे, शेतीसाठी लागणारे बी- बियाणं, खतं, किटकनाशकं अशा सर्वच साहित्याचे भाव गगनाला भिडल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र धनंजय मुंडे यांनी केलेल्या या नव्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना खतासाठीही 100 टक्के अनुदार मिळणार आहे.