“या” तारखेला ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी २००० रुपये

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’अंतर्गत जाहीर केली. कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागांमधील १०० शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केली आहे. आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा गणेशोत्सवापूर्वी लाभ दिला जाणार आहे.