Satbara Utara : सातबारा उताऱ्यावर वारसा नोंद आता ऑनलाइन, असा करा अर्ज

यामुळे पूर्वी तलाठी सर्कल यांची भेट घेऊन वारसा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागायचा. यामध्ये तलाठी भेटेल याची शाश्वती नसायची. यात होणारा वेळ वाचवण्यासाठी सरकारकडून ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. यामुळे पैशाचा होणारा गैरव्यवहारही काही प्रमाणात थांबणार आहे.

वारस ऑनलाइन नोंदविण्यासाठी काय कराल ?

https/pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे.

‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पेज उघडावे.

संबंधित पेजवर गेल्यानंतर प्रासिड टू लॉगिन करून आधी स्वतःचे खाते उघडावे व नंतर वारस नोंदीसाठी अर्ज करावा.