Free shilai Mashin: नमस्कार आपण पाहतो की सरकार हे नवनवीन योजना राबवत असतात, त्यातीलच एक योजना म्हणजेच मोफत शिलाई मशीन योजना ही योजना. ही योजना 2019 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता काय आहे, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, ही योजना सुरू करण्याचा उद्देश काय आहे आणि त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज फॉर्म डाऊनलोड कसा करायचा किंवा कोठून घ्यायचा आणि अर्ज कसा व कोठे करायचा हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
आपण पाहतो की आपल्या देशातील महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. मोफत शिलाई मशीन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 पासून सुरू केलेली आहे तरीही ती आता सुद्धा सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशात असणाऱ्या गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचे ठरवण्यात आले आहे.
या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील ते आपण इथे पाहणार आहोत. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कष्टकरी आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने राज्यातील 50000 पेक्षा जास्त महिलांना मोफत मशीन देण्याचे ठरवलेले आहे.
आपण पाहतो की या योजनेचा उद्देश हा आहे की महिला ह्या मशीन काम करून स्वतःचा त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुरवू शकतात.तसेच देशात ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्या महिलांना मोफत शिलाई मशीन केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
गोरगरीब महिलांना जर मोफत शिलाई मशीन मिळाली तर त्या महिला घरबसल्या मशीन काम किंवा शिवणकाम करून त्या चांगले उत्पन्न मिळू शकतात आणि मिळालेल्या उत्पन्नातून आपला स्वतःचा त्याचबरोबर कुटुंबाचा खर्च भागू शकतात. या योजनेच्या माध्यमातून महिला या सक्षम आणि स्वावलंबी बनतील त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यास या योजनेचा खूप मोठा फायदा होईल.Free shilai Mashin