Skip to content
Talathi bharti 2023: तलाठी भरती साठी लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू.
talathi bharti 2023 : नमस्कार मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये तलाठी भरती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. राज्यात रिक्त असलेल्या तलाठी पदाच्या जवळपास 4000 जागा या डिसेंबर महिन्यात भरण्यात येणार आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 4000 जागांसाठी अखेर भरती केली जाणार असल्याचे महसूल मंत्री राधा कृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (Talathi Bharti 2023)
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
राज्यात विभागानुसार तसेच जिल्हा नूसार तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12 हजार 636 पदांपैकी 8 हजार 574 पदे स्थायी स्वरूपात असून, त्यापैकी उर्वरित 4 हजार 62 पदे अस्थायी स्वरूपात भरलेली आहेत. राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहेत. सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना प्रकाशित झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.