Namo Yojana:नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
गावानुसार पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर
येथे पहा यादी मध्ये तुमचे नाव
Land Laws In Maharashtra:तुकडाबंदी कायद्यात मोठा बदल; 10 गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, त्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता यावे यासाठी राज्य शासन नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करते.
केंद्र शासन देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. यामध्ये पीएम किसान योजना ही केंद्राची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एका वर्षात तीन हप्ते दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले असून दिवाळीपूर्वी या योजनेचा पंधरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल असा आशावाद आता व्यक्त केला जाऊ लागला आहे. ही योजना देशभरातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असून यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.Namo Yojana
दरम्यान या योजनेची लोकप्रियता पाहता आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेप्रमाणे राज्यात नमो शेतकरी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली एक महत्त्वाची योजना आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की ‘शासन आपल्या दारी’सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीकविमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला.
यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला. आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली. आजवर साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे.