fertilizer subsidy: कृषी मंत्री धनंजय मुंडेंची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा;शेतकऱ्यांना खतासाठीही 100 टक्के अनुदार मिळणार

fertilizer subsidy:कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. महागाई वाढली आहे, शेतीसाठी लागणारे बी- बियाणं, खतं, किटकनाशकं अशा सर्वच साहित्याचे भाव गगनाला भिडल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र धनंजय मुंडे यांनी केलेल्या या नव्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना खतासाठीही 100 टक्के अनुदार मिळणार आहे.

धनंजय मुंडेंची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

शेतकऱ्यांना खतासाठीही 100 टक्के अनुदार मिळणार

धनंजय मुंडे यांनी ही घोषणा स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी केली आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येत होते. मात्र आता यामध्ये खतांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या योजनेमध्ये आता खतासाठी देखील शंभर टक्के अनुदान देण्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

सध्या बाजारात खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. फळबाग लागवडीमध्ये खतांचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवत योजनेंतर्गत आतापर्यंत विविध कामांसाठी शंभर टक्के अनुदान होतं. मात्र यामध्ये खतांचा समावेश नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडत होता. मात्र आता खतांसाठी शंभर टक्के अनुदानाची घोषणा करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते.त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री श्री. मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.

Leave a Comment