5 लाखांपर्यंत मोफत उपचार.
या योजनेसाठी असा करा अर्ज
या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतो. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
काय आहे या योजनेची पात्रता ?
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गातील लाखो लोक घेत आहेत. या योजनेचा लाभ आदिवासी (SC/ST) बेघर, निराधार, बेघर, भिकारी, मजूर यांच्यासह अनेक वर्गाला घेता येईल. या योजनेसाठी काय पात्रता आहे, याची माहिती PMJAY च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर Am | Eligible या टॅबवर क्लिक करा. या पेजवर मोबाईल क्रमांक आणि राशन कार्ड क्रमांक नोंदवा. त्याआधारे काही मिनिटांतच तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत की नाही, हे समोर येईल.
योजनेतंर्गत मिळतात या सुविधा :-
या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येईल. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करणार. या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे. उपचारासाठी एक रुपया पण द्यावा लागणार नाही.
या कागदपत्रांची आवश्यकता :-
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- इनकम सर्टिफिकेट
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो