Crop Insurance 2023 : शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार खूपच गरजेचा आहे. पण पीकविमा योजनेच्या कोणत्या ट्रिगरमध्ये या परिस्थितीत पीकविमा मिळू शकतो? त्याचे निकष काय? त्याची प्रक्रिया काय? याची केलेली ही उकल
25 हजार रुपये हेक्टरी सोयाबीन कापूस पिक विमा
जाणून घ्या प्रक्रिया
Crop Insurance Compensation Process : पावसानं यंदा चांगलीच चिंता वाढवली. एकतर आधीच जून महिन्यात पाऊस नसल्याने पेरण्यांना उशीर झाला. जुलै महिन्यातही दोनच आठवड्यांमध्ये पाऊस पडला. ऑगस्टचेही दोन आठवडे कोरडे गेले. यामुळे पिके माना टाकत आहेत. काही भागांमध्ये पेरण्याही उलटल्या. ऑगस्टच्या उर्वरित दिवसांमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. यामुळे पीक हातचे जाण्याची वेळ आली. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार खूपच गरजेचा आहे. पण पीकविमा योजनेच्या कोणत्या ट्रिगरमध्ये या परिस्थितीत पीकविमा मिळू शकतो? त्याचे निकष काय? त्याची प्रक्रिया काय? याची केलेली ही उकल…Crop Insurance 2023
पावसात खंड पडल्यास पीकविमा मिळतो का? Crop Insurance 2023
राज्यात पडलेल्या पावसावरून असे लक्षात येते, की राज्यातील किमान ७०० मंडलांमध्ये १५ दिवस पाऊस पडला नाही. पिकांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीत पीकविम्याचाही लाभ मिळू शकतो. लागवडीनंतर पावसात खंड पडल्यास पीकविमा भरपाईचा एक ट्रिगर लगू पडतो. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत पीकविमा भरपाई मिळते. या ट्रिगरनुसार, पीक काढणीच्या १५ दिवस आधी पूर आला, पावसात खंड पडला, दुष्काळ पडला किंवा आदी संकटांमुळे नुकसान झाल्यास पीकविमा भरपाई मिळते. त्यासाठी पावसात सलग २१ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस त्या मंडळात पाऊस झालेला नसावा.एखाद्या मंडलात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस पडला नाही तर नुकसान भरपाईचा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर लागू पडतो. पण हा ट्रिगर सरसकट लागू होत नाही. चालू हंगामातील अपेक्षित उत्पादन गेल्या सात वर्षांमधील सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता असेल तरच हा ट्रिगर लागू पडतो.