DTP Maharashtra Recruitment: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती, विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. विभागातील “शिपाई ” (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
शिपाई पदाच्या भरपूर जागा, पात्रता 10 वी पास
जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
सदर भरतीसाठी उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २० सप्टेंबर २०२३ पासून उपलब्ध होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. यासोबतच, रोजगार व स्वयंयोजनालयाच्या http://ese.mah.nic.in/ या वेबसाइटवरही ऑनलाइन अर्ज उपलब्ध होणार आहेत.
नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग तथा संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांनी दिलेल्या विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.DTP Maharashtra Recruitment
शिपाई पदांच्या एकूण १२५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. शिवाय, अर्ज करणारा उमेदवार
वयोमर्यादा :
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे.
तसेच, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
वेतन विषयक :
१५ हजार ते ४७ हजार ६०० रुपयांपर्यत
शिवाय, नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
परीक्षा शुल्क :
राखीव प्रवर्ग : ९०० रुपये
अराखीव प्रवर्ग : १००० रुपये