LPG गॅस सिलिंडर झाले स्वस्त, जाणून घ्या दर

LPG cylinder एलपीजी सिलिंडरच्या दरात १ जानेवारी आधी कपात करण्यात आली आहे. २२ डिसेंबरपासून दिल्ली ते पटनापर्यंत सिलिंडर ३० रुपये ५० पैशांनी स्वस्त झाले आहेत. ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी असणार आहे.

तर घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणता बदल दिसत नाही.

आजपासून दिल्लीत इंडेन कमर्शियल सिलिंडर १७५७ रुपयात मिळेल. याआधी या गॅसचे दर १७९६.५० रुपये इतके होते. कोलकात्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर आता १८६८.५० रुपये झाला आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १७१० रुपये झाले आहेत. याआधी मुंबईत सिलिंडरचा दर १७४९ रुपये इतका होता. Hp

आजचे गॅसचे लाईव्ह दर येथे पहा

एक डिसेंबरला कमर्शियल एलपीजी सिलिंडरचे दर वाढले होते. तर त्याआधी १६ नोव्हेंबर रोजी १९ किलो वजनाच्या सिलिंडरच्या दरात १०० रुपयांहून अधिक वाढ झाली होती. १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडर दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅसच्या दरात ३० ऑगस्ट २०२३ रोजी २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या अपडेटनुसार आजही १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅसचे दर हे जैसे थे आहेत. bharat gas

दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर ९०३ रुपयांना आहे तर कोलकात्यात ९२९ रुपयांना मिळतो. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची विक्री ९०२.५० रुपयांना होत आहे. चेन्नईत ९१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडरची विक्री केली जात आहे. LPG Gas cylinder

Home.. 🏠

Leave a Comment