Maharashtra Rain Update : येत्या ४ दिवसात पावसाचा जोर वाढणार! ‘येथे’ बरसणार जोरदार पाऊस
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या चार दिवसांत राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहर आणि परिसरात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
16 ते 19 जुलै दरम्यान पुढील 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
आजचे कापुस बाजार भाव पाहिले तर हॉल थक्क..! चक्क
एवढ्या रुपयाने वाढले कापसाचे दर..!
राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असला तरी महाराष्ट्रातील काही जिल्हे पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाच्या पेरण्या फसल्या असून बळीराजा संकटात सापडला आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र येत्या चार दिवसांत या भागात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.