Milch Animal Subsidy Scheme:दुधाळ जनावरे गट वितरण्याठी मान्यता, प्रती गाय म्हैस खरेदी करण्यासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान

Milch Animal Subsidy Scheme: राज्यातील दुग्धोत्पादनात (Milk Production) वाढ करण्यासाठी राज्य सरकारने दुधाळ गायी व म्हशींच्या गटांच्या वितरणासाठी विविध प्रवर्गांसाठी अनुदान जाहीर केले आहे.

दुधाळ जनावरे गट वितरण्याठी मान्यता

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के, अनुसूचित जाती, जमाती आणि आदिवासी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत ५० ते ७५ टक्के अनुदानावर जनावरांचे गट वितरित करण्यात येणार आहेत. तसेच मराठवाडा पॅकेजअंतर्गत जालना जिल्ह्यासाठीही दोन हजार गट देण्यात येतील.

दरम्यान, या योजनेअंतर्गत एक ते दोन महिने व्यालेली जनावरे खरेदी करावी लागतील. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची ती असावीत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. निवड समिती लाभार्थींची निवड करेल.Milch Animal Subsidy Scheme

या योजनेची व्यापक जाहिरात व प्रसिद्धी करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांमध्ये ३० टक्के महिलांना प्राधान्य राहील.Milch Animal Subsidy Scheme

ऑनलाइन अर्जांची छाननी करून लाभार्थी समितीमार्फत निवडण्यात येतील. प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी पाच वर्षे ग्राह्य धरण्यात येईल.

जालन्यात दुधाळ जनावरे योजना
मराठवाडा पॅकेजअंतर्गत जालना जिल्ह्यात दुधाळ जनावरे योजना राबविण्यात येईल. या अंतर्गत दोन देशी किंवा संकरित गायी आणि दोन म्हशींचा एक गट अनुदानास पात्र असेल.

देशी किंवा संकरित प्रतिगाय ७० हजार, तर म्हैस ८० हजार रुपयांना खरेदी केल्यास तसेच परराज्यांतून वाहतूक खरेदी केल्यास प्रतिगाय, म्हैस १० हजार असा एकूण खर्च गाईसाठी १ लाख ५० हजार, तर म्हशींसाठी १ लाख ७० हजार खर्च अपेक्षित आहे.

या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येईल. यामध्ये तीन वर्षांसाठी ८ हजार ४२५ व म्हशींसाठी ९ हजार ६२९ रुपये विमा खर्च देण्यात येईल.Milch Animal Subsidy Scheme

अनुसूचित जाती, जमातींसाठी ७५ टक्के अनुदान
अनुसूचित जाती, जमातींसाठी (आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्राबाहेरील) ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ देशी किंवा संकरित गायी आणि दोन म्हशींचा एक गट देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हे अनुदान मिळेल.

यातील गायींच्या एका गटासाठी एक लाख पाच हजार, तर म्हशींच्या गटासाठी १ लाख २० हजार व विमा अनुक्रमे १२ हजार ६३८ व १४ हजार ४४३ असा राहील.

गायींसाठी १ लाख १७ हजार व म्हशींसाठी १ लाख, ३४ हजार, ४४३ रुपयांचे अनुदान मिळेल. लाभार्थ्यांना पाच टक्के स्वत: व २५ टक्के बँकेच्या कर्जातून रक्कम उभारावी लागेल.

सर्वसाधारण गटासाठी ५० अनुदान
सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना दोन देशी किंवा संकरित गायी व दोन म्हशींचा गट ५० टक्के, तर अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदान मिळेल.

५० टक्के अनुदानावर गाईंसाठी ७८ हजार ४२५, तर म्हशींसाठी ८९ हजार ६२९, तर ७५ टक्के अनुदानावर गाईंसाठी १ लाख १७ हजार ६३८ व म्हशींसाठी १ लाख ३४ हजार ४४३ रुपये देण्यात येतील.

सुधारित जातींची जनावरे देणार
प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या एचएफ, जर्सी संकरित गायी व प्रतिदिन आठ ते १० लिटर दूध देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपाकर, प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी, तसेच मुऱ्हा व जाफराबादी या सुधारित जातींच्या म्हशी देण्यात येतील.Milch Animal Subsidy Scheme

दुधाळ जनावरे ही शक्यतो १ ते २ महिन्यांपूर्वी व्यालेली व दुसऱ्या व तिसऱ्या वेताची असावीत

Leave a Comment