PM Kisan Scheme: पी एम किसान योजनेतून 15 व्या हप्त्यापूर्वी लाखो शेतकरी बाद होणार? “हे” काम न केल्यास होणार कारवाई

PM Kisan Scheme:शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पूर्ण करणार नाही किंवा बँक खाती आधार संलग्न‍ करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात येणार आहेत.

पी एम किसान योजनेतून 15 व्या हप्त्यापूर्वी लाखो शेतकरी बाद होणार?

येथे पहा 15 वा हफ्ता तुम्हाला मिळणार की नाही?

पंतप्रधान किसान योजनेची सन २०१९-२० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पूर्ण करणार नाही किंवा बँक खाती आधार संलग्न‍ करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात येणार आहेत.

ई- केवायसी करण्याकरीता मे, जुलै व ऑगस्ट महिन्यात कृषी विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली होती. परंतु अद्यापही जिल्ह्यातील १४ हजार ८२९ लाभार्थ्यांची ई – केवायसी प्रलंबित आहे. तसेच ११ हजार ११७ लाभार्थ्यांची आधार सिडींग प्रलंबित आहे. ई- केवायसी व आधार सिडींग न करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे  वगळण्यासाठी शासनस्तरावरून सूचना प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांनी ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्नीसकरण करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास ७ सप्टेंबर २०२३ पासून अशा शेतकऱ्यांची नावे रद्द करण्यायची कार्यवाही करण्यात येईल.PM Kisan Scheme

पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने या योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार आहे. सरकारने या संदर्भात तारीख जाहीर केली आहे.
मोदी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये, असे वर्षातून सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत दोन हजार रुपयांचे १३ हप्ते पूर्ण झाले आहेत. १३ वा हप्ता २७ फेब्रुवारीला देण्यात आला होता आणि शेतकरी आता १४ व्या हप्त्याची वाट पाहत होते.

‘या’ दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता

सरकारने केलेल्या घोषणेनुसार येत्या २८ जुलैला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार आहे. या दिवशी देशातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना १४ वा हप्ता दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)द्वारे १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थान येथील नागौर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता ट्रान्सफर करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत आणि स्वत: बटण दाबून शेतकऱ्यांच्या ऑनलाईन खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत.

Leave a Comment