pm kisan installment increase : शेतकऱ्यांना येत्या काळात लॉटरी लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार PM शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता वाढवण्याची शक्यता आहे. सध्याच्या हप्त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. किती वाढू शकतो हा हप्ता..
P M KISAN योजनेच्या हप्त्यामध्ये होणार तब्बल “एवढी” वाढ
किती वाढणार हप्ता
देशात पुढील वर्षात लोकसभेसह काही राज्यांमध्ये निवडणुका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या सध्याच्या हप्त्यात वाढ होऊ शकते. फायनेन्शिअल एक्सप्रेसने याविषयीचे वृत्त दिले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेने (PM Kisan Installment) शेतकऱ्यांना नुकताच दिलासा दिला. 27 जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली. त्यानंतर आता हप्त्यात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.
पीएमओ समोर ठेवला प्रस्ताव
एका सरकारी अधिकाऱ्यानुसार, पीएम किसान योजनेतील रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर 20,000-30,000 कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल.
अद्याप कोणताही निर्णय नाही
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढविण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. देशात या वर्षांत चार राज्यातील विधानसभांच्या निवडणुका आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यात निवडणुक आहेत. त्याअगोदर या विषयीची घोषणा होऊ शकते.
असा वाढेल हप्ता pm kisan installment increase
या योजनेतंर्गत दरवर्षी जवळपास साडे आठ कोटी शेतकऱ्यांना रक्कम देण्यात येते. वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात. 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 9000 रुपये जमा होतील.
PM Kisan Yojana : PM किसान सम्मान निधी योजने (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा 14 हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु आहे. पण लवकरच 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 15 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. त्यामुळं लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.