Solar Panel Yojana:Solar Rooftop Yojna : फक्त 33 हजार गुंतवून 25 वर्षापर्यंत वीज बिलापासून सुटका,सोलार रूप-टॉप योजनेचे अर्ज झाले सुरू, अर्ज कसा करायचा आणि इतर माहिती आता जाणून घ्या.
नमस्कार शेतकरी मित्रहो
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
मित्रहो, सध्या आपण पाहतो की, आपल्याला वीज बिल भरमसाठ येत असते. तसं पाहायला गेले तर, भारतामध्ये वीजनिर्मिती करणे ही काही अवघड गोष्ट नाही. परंतु सध्या वीज बिलाचे वाढते तर हा एक भारतीयांसमोर पडलेला खूप मोठा प्रश्न आहे.
परंतु एका दृष्टीने विचार करायला गेले तर इतर देशांच्या तुलनेत भारतातील विजेचा दर हा खूप स्वस्त आहे. मात्र सध्याची वाढत्या महागाईत दरमहा येणाऱ्या लाईट बिलांनी सर्वसामान्यांचे जगणं अगदी मुश्किल करून ठेवला आहे. आणि त्यामुळेच विजेच्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून सौरऊर्जेला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना येत आहेत.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
सरकारने काही दिवसांपूर्वीच सौर पॅनल योजनेअंतर्गत (Solar Rooftop Yojna) देशातील जनतेला त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. देशातील विजेचा वापर कमी व्हावा. आणि सौरऊर्जेवरील ऊर्जेचा वापर जास्त व्हावा हाच ही योजना चालू करण्यामागचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लोकांना परवडणाऱ्या दरात वीज मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर, या योजनेअंतर्गत सोलार पॅनल बसवल्यानंतर आपला सर्वात मोठा हा फायदा होतो की, यासाठी एकदाच पैसे खर्च करावे लागतात त्यानंतर तुम्ही जवळपास 25 वर्षांपर्यंत मोफत वीज मिळू शकता.
मित्रहो, सरकारच्या या सोलर पॅनल (Solar Rooftop Yojna) सबसिडी योजनेअंतर्गत तुम्हाला किती सबसिडी मिळेल? त्याचबरोबर सबसिडीसाठी कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? ही आवश्यक माहिती आजच्या या लेखातून आपण घेणार आहोत.
तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही जवळपास 25 वर्षांच्या वीज बिलापासून सुटका मिळवू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला सौर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून काही प्रमाणात सबसिडी दिली जाते, आणि उर्वरित पैसे तुम्ही स्वतः भरायचे असते. यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे आपण भरलेले पैसे आपल्याला पुढच्या जवळपास पाच वर्षांमध्ये कव्हर केले जातात. आणि त्यानंतर तुम्हाला पुढील वीस वर्षे मोफत विजेचा लाभ मिळू शकेल. त्याचबरोबर सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्ही अगदी कमी खर्चात 24 तास विजेचा आनंद घेऊ शकता.