Tractor:ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 50% अनुदान

Maha dbt scheme : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान, या पद्धतीने करा अर्ज.

tractor farming कृषि विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची तसेच, बाहय सहाय्यित प्रकल्पांची अमंलबजावणी करण्यात येते. केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृती आराखडे अंतिम झाल्यानंतर शासनास वर्षभरात एक किंवा दोन टप्प्यांत निधी प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, राज्य पुरस्कृत योजनांसाठी देखील टप्प्या-टप्प्याने निधी प्राप्त होतो.

ट्रॅक्टर साठी मिळणार 50 टक्के अनुदान,येथे करा अर्ज.

कृषि विभागास निधी टप्प्या-टप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषि क्षेत्राचे कामकाज हे हंगाम निहाय चालते तसेच, खरीप व रब्बी हंगामात लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे ७५% क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांची लागवड होते. त्यामुळे खरीप हंगाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या बाबींची खरीप हंगाम पूर्व व हंगाम कालावधीतच अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते. यामध्ये यंत्र व औजारे या बाबींचा समावेश आहे.

सदर योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती / जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ५०% किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ४०% किंवा रु. १ लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

ट्रॅक्टर साठी मिळणार 50 टक्के अनुदान,येथे करा अर्ज.

अर्ज कोठे करायचा ?

या योजनेचा ट्रॅक्टर अनुदान लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी maha-DBT या महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आपल्याला जर अर्ज करता येत असेल तर आपण स्वतः अर्ज करू शकता किंवा आपल्या गावातील सीएससी केंद्र, महा ई केंद्र अशा ठिकाणी जाऊन आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर याची दर महिन्याला लॉटरी काढली जाते. लॉटरी निघाल्यानंतर जर तुमचे नाव त्या लॉटरीमध्ये लागले तर आपल्याला हे ट्रॅक्टर दिले जाईल. tractor farming

Breaking news:अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास,मिळणार नुकसान भरपाई

Leave a Comment