विहिरीसाठी अर्ज डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇👇
व शासन निर्णय पाहण्यासाठी
भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून ३,८७,५०० विहीरी खोदणे शक्य आहे . मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर ( ठिबक / तुषार लावून ) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल Well grant
१. लाभधारकाची निवड :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ ( ४ ) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत . अ ) ब ) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती I क ) ड ) इ ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी फ ) ग ) निरधिसूचित जमाती ( विमुक्त जाती ) स्त्री – कर्ता असलेली कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे ह ) जमीन सुधारणांचे लाभार्थी आय ) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :
१ ) ७/१२ चा ऑनलाईन उतारा
२ ) ८ अ चा ऑनलाईन उतारा
३ ) जॉबकार्ड ची प्रत