board exam : 10-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 हजार रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा

board exam:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी दि. १४ , २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि.रा. डिंगळे यांनी केले आहे.

10-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 हजार रुपये

येथे करा अर्ज

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर,नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये, इतर महसूली विभागतील शहरात व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू ५१ हजार रुपये व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते, अशी माहिती श्री. डिंगळे यांनी दिली. board exam

 

योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती

इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली आहे.

योजनेच्या अटी board exam :-

  • विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
  • या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के गुण असणार आहे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा.
  • गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न करून घेणे बंधनकारक आहे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.

या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येईल.⬇️

टिप :- वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रू.पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु. दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष/टपालाद्वारे आवश्यक कागदपत्रासह दाखल करावेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना व सविस्तर माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.inhttps://sjsa.maharashtra.gov.inhttps://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Leave a Comment