Dairy Farming Subsidy:शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचाय? सरकार देते ५ लाख रुपये अनुदान

Dairy Farming Subsidy:शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला पर्याय म्हणून पहात असाल तर या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया..

ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांसाठी दुग्ध व्यवसाय हा उदरनिर्वाहाचे उत्तम साधन आहे. ‘डेअरी फार्मिंग’ साठी शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी पुढे यावे यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दूध व्यवसायिकाला डेअरीसाठी ५ लाख रुपये अनुदान देण्यात येते.

सरकार देते ५ लाख रुपये अनुदान

कसा कराल अर्ज?

 

या योजनेअंतर्गत दूध उत्पादनापासून दुग्धजन्य पदार्थांच्या युनिट निर्मितीसाठीही अनुदान दिले जाते. अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणेही खरेदी करता येतात.

New Rules On Aadhaar : आता आधार कार्ड नाही तर हा पुरावा महत्वाचा, 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम होणार लागू

या योजनेअंतर्गत नक्की काय लाभ आहेत?

  • जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदी केली असेल आणि त्याची किंमत 13.20 लाख रुपये असेल तर तुम्हाला त्यावर 25 टक्के (3.30 लाख रुपये) भांडवली सबसिडी मिळू शकते.
  • तुम्ही SC/ST प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला यासाठी 4.40 लाख रुपयांची सबसिडी मिळू शकते.
  • या योजनेत कर्जाची रक्कम बँकेकडून मंजूर केली जाईल आणि 25% लाभार्थींना दिली जाईल.
  • जर तुम्हाला पाचपेक्षा कमी गायींची डेअरी सुरू करायची असेल तर तुम्हाला त्यांच्या खर्चाचा पुरावा द्यावा लागेल. ज्या अंतर्गत सरकार 50% सबसिडी देईल.
  • शेतकऱ्यांना ५० टक्के रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये बँकेला भरावी लागेल.

अनुदानाची मर्यादा किती?

  • दहा पशु डेअरीवर 25% अनुदान (SC-ST ३३.३३%) भांडवली अनुदान मर्यादा १.२५ लाख असून मागासवर्गांसाठी ही मर्यादा १ लाख ६७ हजार एवढी आहे.
  • दोन पशु युनिटसाठी २५ हजार रुपये (मागासवर्ग- ३३००) कमाल भांडवली अनुदान मंजूर आहे.
  • व्यवसायाच्या आकारानुसार हे अनुदान मर्यादित केले जाईल.

या योजनेतून अनुदान किंवा कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला नाबार्डला अर्ज करणे अनिवार्य आहे.

Leave a Comment