मिळालेल्या माहितीनुसार, शिधापत्रिकाधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिका आणि आधार कार्ड नंबर लिंक करण्यास सांगण्यात आलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत आधार सीडिंग न केल्यास शिधापत्रिका बंद केली जाणार आहे. बिहारमध्ये सुमारे 1.7 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. नालंदा जिल्ह्यात 25 लाख 18 हजार 770 ग्राहकांपैकी 20 लाख 97 हजार 825 ग्राहकांनी आपली शिधापत्रिका आधारशी लिंक केली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यातील सुमारे 80 टक्के कार्डधारकांनी आपलं रेशन कार्ड आधारशी लिंक केलेलं आहे.
Beneficiary List Namo Shetkari:नमो शेतकरी 4000 हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर
उर्वरित लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिका आधारशी लिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे लाभार्थी आधार कार्ड आणि शिधापत्रिका लिंक करणार नाहीत त्यांची शिधापत्रिका बनावट असल्याचं समजून लाभार्थ्यांच्या यादीतून डिलिट करण्यात येईल. यानंतर संबंधित शिधापत्रिकेची आकडेवारी उपलब्ध न झाल्यास शासकीय धान्य मिळणं बंद होईल. राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा कार्यालयांना या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात मोहीम राबवून शिधापत्रिकाधारकांचं आधार सीडिंग करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत.
आपली शिधापत्रिका आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला शिधापत्रिकेत नमूद केलेल्या सर्व सदस्यांचा आधार क्रमांक द्यावा लागेल. लहान-मोठ्या सर्व सदस्यांचा आधार क्रमांक देणं गरजेचं आहे. शिधापत्रिका डिलिट होण्यापासून वाचवण्यासाठी संबंधित डीलर किंवा ब्लॉक पुरवठा शाखेत एका अर्जासोबत तुम्ही आधार क्रमांक देऊ शकतात.
सरकारच्या वतीनं ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत देशभरात मोफत धान्य (रेशन) वितरण केलं जातं. कोरोना महामारीच्या काळात या योजनेमुळे अनेकांना फार मोठा आधार मिळाला. अनेक कुटुंबं उपासमार होण्यापासून वाचली. या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमध्ये गहू आणि तांदूळ वितरित केले जातात